बाळासाहेबांना अपेक्षित असणाऱ्या योजना आमचं युतीचं सरकार पुर्ण करेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी सांगितले की, तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मनोहर जोशी यांची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा आणि मार्गदर्शन हे मोलाचे असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची सदिच्छ भेट घेतली. यावेळी मनोहर जोशी यांनी त्यांना त्यांच्या मुख्यमंत्री काळात राबविलेल्या 60 प्रभावी योजनांचे पुस्तक भेट दिले. या योजना प्रभावीपणे राबविण्याचा सल्लाही यावेळी मनोहर जोशी यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांना दिला. भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी सांगितले की, तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मनोहर जोशी यांची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा आणि मार्गदर्शन हे मोलाचे असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. बाळासाहेबांना अपेक्षित असणाऱ्या योजना आमचं युतीचं सरकार पूर्ण करेल असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या आधी त्यांनी गजानन किर्तीकर आणि लीलाधर डाके या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. मुळ्यामंत्यांच्या या भेटीगाठींमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.