देशात जातीनिहाय जनगणना केली पाहिजे ही आमची मागणी- नाना पटोले
केंद्रातलं मोदीच सरकार जे आलं आणि ते ओबीसीचे प्रधानमंत्री झाले, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. मात्र गुजरात मधून त्यांचा सगळी डिटेल माहिती आम्ही गोळा केली आहे ते मोदी हे ओबीसीचे नाहीत
जातीनिहाय जनगणनेचा (Caste wise census)मी आता उल्लेख केला. मी विधानसभा अध्यक्षस्थानी असताना एक ठराव मी स्वतः आणला आणि तो ठराव एकमताने विधानसभेत पारित केला आणि मग देशातल्या अनेक विधानसभेमध्ये पारित झाला. पण कोरोनाच्या (corona) काळामध्ये जातीनिहाय जनगणना होऊ शकली नाही. आता ती पुढच्या काळात त्यांना करावीच लागणार आहे. असं मत भाजप(BJP) नेते नाना पटोले यांनी मांडले आहे. त्यामुळे देशांची जातीनिहाय जनगणना केली पाहिजे ही मागणी आमची सगळ्यांची राहणार आहे. केंद्रातलं मोदीच सरकार जे आलं आणि ते ओबीसीचे प्रधानमंत्री झाले, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. मात्र गुजरात मधून त्यांचा सगळी डिटेल माहिती आम्ही गोळा केली आहे ते मोदी हे ओबीसीचे नाहीत, ‘मोदी’ ही अप्पर कास्ट आहे, आणि ते मी मोठे बिझनेस वाले लोक आहेत त्याच्यातलेच पंतप्रधान मोदी आहेत असा टोलाही पाटोळे यांनी भाजपाला लगावला आहे.