मणिपूरमधील घटनेवरून ठाकरे गटाचं जोरदार आंदोलन, महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सरकारचा निषेध
तर यावेळी ठाकरे गटासह विरोधकांनी, मणिपूरमधील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात तोंडाला काळ्या फिती बांधून आंदोलन करत सरकारचा निषेध केला आहे. तसेच मंत्रालय परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले आहे. तर याच मणिपूर घटनेवरून देशभरात पडसाद उमटले असून या घटनेविरोधात महाराष्ट्रात ठाकरे गट रस्त्यावर उतरला आहे.
मुंबई, 2 ऑगस्ट 2023 | मणिपूर हिंसाचार, महिलांवर अत्याचार आणि महिलांची काढलेली नग्न धिंडीवरून महाराष्ट्रात राण उठवणाऱ्या विरोधकांनी दिल्लीचं तख्ताला ही हादरे दिले आहे. तर यावेळी ठाकरे गटासह विरोधकांनी, मणिपूरमधील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात तोंडाला काळ्या फिती बांधून आंदोलन करत सरकारचा निषेध केला आहे. तसेच मंत्रालय परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले आहे. तर याच मणिपूर घटनेवरून देशभरात पडसाद उमटले असून या घटनेविरोधात महाराष्ट्रात ठाकरे गट रस्त्यावर उतरला आहे. त्याचपद्धतीने ठाकरे गट रस्त्यावर उतरला आहे. तर मणिपूर घटनेवरून केंद्र सरकारच्या विरोधात मुक मोर्चा केला आहे. यावेळी केंद्र सरकार तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे. त्याचदरम्यान खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेतून केंद्र सरकारवर हल्लाबोल करत टीका केली होती. तसेच या सरकारला मणिपूर बाबत काहीही वाटतं नसल्याचं देखील त्यांनी म्हणताना, याबाबत आम्ही इंडियाच्या माध्यमातून संसदेत आणि संसदेच्या बाहेर देखील आवाज उठवत राहू असे त्यांनी म्हटलं होतं.