ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे, केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची टीका
चंद्रकांत खैरे एकदा अपयशी ठरलेले आणि जनतेने नाकारलेले नेतृत्व आहे, त्यामुळे जनता त्यांना पुन्हा स्वीकारणार नसल्याचा दावा भाजपाचे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केला आहे. महायुतीतून शिवसेना किंवा भाजपा कोणालाही तिकीट दिले तरी तो महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून आणणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संभाजीनगर : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने छत्रपती संभाजीनगरातून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिलेली आहे. मात्र या जागेसाठी महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतील त्यावेळी संभाजीनगरातील महायुतीचा उमेदवार तेथे असेल असे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी म्हटले आहे. मोदीजी यांचे हात मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त खासदार निवडून देण्याची तयारी महाराष्ट्रातील जनतेने केली असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीचा उमेदवाराला मग तो शिवसेनेचा असो की भाजपाचा कि राष्ट्रवादीचा त्याला निवडून देण्याचा निर्णय जनतेने घेतल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टी काही काम करीत नाही केवळ मोठमोठ्या गप्पा मारते अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे. त्याला उत्तर देतान भागवत कराड यांनी पाणी प्रश्नासाठी केंद्राने जवळजवळ 700 ते 800 कोटी,1200 कोटी एमएसईबीसाठी दिले, दीड ते दोन हजार कोटी रुपये जल जीवन मिशन करीता दिले, विमानतळासाठी विस्तारीकरणासाठी दिले आहेत. साडे चार हजार कोटी रुपये पीएनजी गॅससाठी दिले आहेत. हे इम्तियाज जलील यांना माहीती नाहीत का त्यांनी आणि ओवेसी यांनी आपल्या चष्म्याने नंबर बदलावेत अशीही टीका भागवत कराड यांनी केली आहे.