Breaking | भाजप मंत्र्यांचे पीए प्रशिक्षित तरुण असणार, भाजपचा धोरणात्मक निर्णय-TV9
आता भाजप मंत्र्यांचे हे प्रशिक्षित तरुण असणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. तर हा भाजपचा धोरणात्मक निर्णय असल्याचेही म्हटलं जात आहे. तर रामभाऊ माळगी प्रबोधनेतील प्रशिक्षित पीए हे भाजपच्या मंत्र्यांचे पीए म्हणून काम पाहणार असल्याची सांगण्यात येत आहे.
सध्या राज्यातील तापलेल्या राजकारणात आणखीन एक मुद्दा चांगलाच गरम आणि सगळीकडे चर्चेला येत आहे. तो म्हणजे पीए, पीएस यांचा. मागील सरकारमधील मंत्र्यांचे काही पीए, पीएस आत्ताच्या मंत्र्यांकडे असल्याचे पहायला मिळत आहे. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते घेत असताना त्यांचे रेकॉर्ड तपासा, ते बदनाम झालेले असतील तर त्यांना अजिबात घेऊ नका, असे म्हटले होतं. त्यावरून जोरदार टीका विरोधकांनी केली होती. यानंतर आता भाजप मंत्र्यांचे हे प्रशिक्षित तरुण असणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. तर हा भाजपचा धोरणात्मक निर्णय असल्याचेही म्हटलं जात आहे. तर रामभाऊ माळगी प्रबोधनेतील प्रशिक्षित पीए हे भाजपच्या मंत्र्यांचे पीए म्हणून काम पाहणार असल्याची सांगण्यात येत आहे.
Published on: Aug 25, 2022 09:51 AM