श्री सदस्यांच्या मृत्यूवर बोलायला मंत्र्यांना लाज वाटायला पाहिजे; काँग्रेस नेत्याचा घणाघात
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी मंत्र्यांवर जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी श्री सदस्यांच्या मृत्यूवर बोलायला मंत्र्यांना लाज वाटायला पाहिजे असा घणाघात केला आहे
नागपूर : पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात उष्मघातामुळे 12 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. त्यावरून राज्य सरकारला यासाठी जबाबदार धरत त्यांच्यावर मणुष्यवधाचा गुन्हा करावा अशी मागणी आता होत आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी मंत्र्यांवर जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी श्री सदस्यांच्या मृत्यूवर बोलायला मंत्र्यांना लाज वाटायला पाहिजे असा घणाघात केला आहे. तर या प्रकारावर वरिष्ठ नेत्यांशी बोलणं सुरू असून श्री सदस्यांच्या मृत्यूवर विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी काँग्रेस करणार असल्याचेही ते म्हणाले.
Published on: Apr 20, 2023 08:11 AM