पंकजा मुंडे शिवसेनेत? चंद्रकांत खैरे म्हणाले, कधीही… काहीही…
उद्धव गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पक्षात स्वागत असेल असे सांगतले आहे. त्यापाठोपाठ शिवसेना नेते चंद्रकांत जाहीर यांनीही मोठे वक्तव्य केले आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यातील गावागावात भाजप पक्ष पोहोचवण्याचे काम स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे ( GOPINATH MUNDE ) यांनी केले. त्यांची मुलगी पंकजा मुंडे ( PANKAJA MUNDE ) हिच्यावर भाजप अन्याय करत आहे. पंकजा मुंडे या खऱ्या युतीमधील खऱ्या वारस आहे असे भाजप नेते चंद्रकांत खैरे ( CHANDRAKANT KHAIRE ) म्हणाले.
भाजपमध्ये किरीट सोमैया ( KIRIT SOMAIYA ) हा मूर्ख माणूस आहे. ज्यांच्याकडे खोके आले ते नागपूरवरून आले, दिल्लीवरून आले की आणखी कुठून कुठून आले त्याची माहिती कधी घेतली का? कुणाची सुपारी घेतली? आपल्या थोबाडाची काळजी घे, असा सल्ला त्यांनी दिला.
पंकजा मुंडे यांच्याबाबतीत भाजप राजकारण करत आहे. आमदार सुनील शिंदे यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत जे काही म्हणाले त्यात तथ्य आहे. पंकजा आणि उद्धव ठाकरे यांचे बोलणे झाले आहे. कधीही काही होऊ शकते असेही त्यांनी सांगितले आहे.