मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावेळी का गेले नव्हते?; शहाजीबापू पाटील यांनी कारण सांगितलं…

| Updated on: Apr 10, 2023 | 3:08 PM

Shahajibapu Patil on CM Ekanth Shinde Ayodhya Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याला गैरहजेरी का? शहाजीबापू पाटील यांनी कारण सांगितलं. पाहा व्हीडिओ...

पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील गैरहजर होते. ते नेमकं अयोध्येला का गेले नाहीत? याचं उत्तर शहाजीबापू पाटलांनीच दिलं आहे. सांगोल्यात राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्याचा मी स्वागताध्यक्ष होतो. इंद्रजित भालेराव यांच्यासह इतर सहाशे ते सातशे साहित्यिक तिथं आले होते. अशावेळी तो कार्यक्रम तसाच टाकून अयोध्येला जाणं योग्य वाटलं नाही. म्हणून मी गेलो नव्हतो, असं शहाजीबापू म्हणाले. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित परवानगी मागितली. त्यांच्या परवानगीनेच मी अयोध्येला गेलो नाही, असंही शहाजीबापू म्हणाले आहेत.

Published on: Apr 10, 2023 03:08 PM
महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठा गुंड; राऊतांवर शिवसेनेच्या नेत्याचा घणाघात
नाराजी नाही, उलट तुमचेच आमदार, खासदार आमच्या संपर्कात; राऊतांना शिवसेनेच्या नेत्याने डिवचलं