Nirjala Ekadashi | निर्जला एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

| Updated on: Jun 21, 2021 | 10:16 AM

आज जेष्ठ शुद्ध निर्जला एकादशी आहे. या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सुवासिक सुंदर अशा विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. (Pandharpur Vitthal Rukmini Temple decorate with flowers)

पंढरपूर : आज जेष्ठ शुद्ध निर्जला एकादशी आहे. या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सुवासिक सुंदर अशा विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा, चौखांबी, सोळखांबी अशा मंदिरातील विविध भागाना या रंगीबेरंगी फुलांनी सुशोभीकरण करण्यात आले आहे. यात पिंक डिजे, कामिनी, गुलाब, झेंडू, गुलछडी, ऑरकेड अशा विविध रंगीबेरंगी फुलांचा समावेश आहे.

मंदिराला अशा विविध फुलांनी सजवण्यात आल्याने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे. विशेष म्हणजे सध्या हा सर्व परिसर फुलांच्या सुगंधाने दरवळून निघाला आहे. तसेच यामुळे भाविकही सुखावले आहेत. पुणे येथील विठ्ठल भक्त संदिप पोकळे आणि सचिन चव्हाण यांनी ही सजावट केली आहे. कोरोना संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर बंद आहे. मात्र मंदिरात जाऊन भाविकांना घेता येत नसलं तरी देवाचे हे मनमोहक रुप तुम्हाला घरबसल्या पाहायला मिळत आहे.

Mumbai | लोकल सुरु करण्यासाठी आणखी आठवडा लागणार, MMRDA, मनपा अधिकारी, तज्ज्ञांमध्ये बैठक
Nashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ राहणार उपस्थित