मुंडे बहिणभावांचा वाद श्रेयवादावरुन तापला
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे राजकीय वाद रंगला असल्याने आता या पुलाचे श्रेय कोणाला द्यायेच यावरही आता चर्चा रंगू लागली आहे.
परळीतील श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल व छत्रपती संभाजी महाराज चौक ते औष्णिक विद्युत केंद्र रस्त्यासाठी उड्डाणपूल मंजूर झाला आहे, त्या पुलावरुन आता श्रेयवादावरून बीडच्या राजकारणात बहीण भावांमध्ये जुंपली आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्यामुळे हा निधी मिळाला असल्याचे सांगितले आहे तर धनंजय मुंडे यांनी केंद्राकडून जो निधी मिळाला आहे तो आपल्यामुळेच मिळाला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बीडच्या राजकारणात आता पुन्हा एकदा बहीण भावांचा राजकारण तापल्याचे दिसत आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे राजकीय वाद रंगला असल्याने आता या पुलाचे श्रेय कोणाला द्यायेच यावरही आता चर्चा रंगू लागली आहे.
Published on: Jul 18, 2022 12:40 AM