“मी पक्षाची, पण पक्षाची मी नाही”, पंकजा मुंडे यांचं मोठं विधान

| Updated on: Jun 01, 2023 | 9:06 AM

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने दिल्लीत आज राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी सूचक विधान केलं. "आमचाही नेता चहा विकता विकता बनला की प्रधानमंत्री. माझंही लक्ष राष्ट्रीय समाज पक्षावर आहे. हा पक्ष माझ्या भावाचा आहे. जानकर म्हणाले की ताईंच्या पक्षानं हे केलं. भाजप माझा थोडी आहे.

नवी दिल्ली: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने दिल्लीत आज राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी सूचक विधान केलं. “आमचाही नेता चहा विकता विकता बनला की प्रधानमंत्री. माझंही लक्ष राष्ट्रीय समाज पक्षावर आहे. हा पक्ष माझ्या भावाचा आहे. जानकर म्हणाले की ताईंच्या पक्षानं हे केलं. भाजप माझा थोडी आहे. मी भाजपात आहे. भाजप पक्ष मोठा आहे. मुंडे साहेब होते तेव्हा छोट्या-छोट्या माणसांना घेऊन बनवलं. तेव्हा पक्षाने सत्तेचं तोंड पाहिलं”, असं पंकजा आपल्या भाषणात म्हणाल्या. तसेच “मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईल. महादेव जानकर जातील मेंढ्या वळायला. अजून काय आहे”, असा इशाराच पंकजा मुंडे यांनी भाजपला केला आहे.

Published on: Jun 01, 2023 09:06 AM
शिवसेना खासदार कीर्तीकर यांची ‘त्या’ दाव्यावर सारवासारव; यू-टर्न घेत म्हणाले, ”सापत्न वागणूक…”
VIDEO : अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांची भाजपवर टीका तर शिंदे याचं कौतुक; काय कारण?