Pankaja Munde On BJP Morcha | भाजपच्या औरंगाबमधील मोर्चात सहभागी का नाही झालात?

| Updated on: May 24, 2022 | 11:01 PM

मी राष्ट्रीय लेव्हलवर काम करत असल्यामुळे कदाचित लोकल लोकांनी तो मोर्चा काढला असेल. ती चांगली गोष्ट आहे. मी त्या मोर्चात अपेक्षित असते तर मी नक्की आले असते. कदाचित तो लोकल लीडरचा मोर्चा होता त्यामुळे मी आले नाही, असा सणसणीत टोला पंकजा मुंडे यांना लगावला आहे.

औरंगाबाद: पाण्याच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे अत्यंत विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजप नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या नव्हत्या. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच पंकजा मुंडे (Pankaja munde) यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ज्या फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पाणी प्रश्नावर मोर्चा (jal akrosh morcha) काढण्यात आला. त्या मोर्चाची पंकजा मुंडे यांनी संभावना केली आहे. मी राष्ट्रीय लेव्हलवर काम करते. कालच्या मोर्चात कदाचित माझी उपस्थिती अपेक्षित नसावी. त्यामुळे मी आले नाही. पण कालचा मोर्चा हा लोकल लीडर्सचा मोर्चा होता, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पंकजा यांच्या या धक्कादायक विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात असून भाजपमध्ये धुसफूस असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे. पंकजा मुंडे या मीडियाशी संवाद साधत होत्या.

Published on: May 24, 2022 11:01 PM
Special Report | यूपीच्या पैलवानामागे खरा ‘वस्ताद’ कोण ?
indorikar maharaj | इंदोरीकर महाराजांचे 30 मे पर्यतचे सर्व कार्यक्रम रद्द