पंकजा मुंडे ठाकरे गटात तर अमित देशमुख भाजपात, नेमकं काय होणार जाणून घ्या ४ मिनिट २४ हेडलाईन्समध्ये

| Updated on: Jan 13, 2023 | 8:41 AM

पंकजा मुंडे आमच्यासोबत आल्यास त्यांचे आम्ही स्वागत करू असं आमदार शिंदे म्हणालेत.

मुंबई : भाजपमध्ये ( BJP ) नाराज असलेल्या नेत्या पंकजा मुंडे ( PANKAJA MUNDE )  यांना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे ( MLC SUNIL SHINDE ) यांनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे आमच्यासोबत आल्यास त्यांचे आम्ही स्वागत करू असंही आमदार शिंदे म्हणालेत.

भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला कॉंग्रेस आमदार अमित देशमुख ( AMIT DESHMUKH ) यांनी पूर्णविराम दिलाय. कितीही वादळं आली तरी मी देशमुख वाड्यातच रहाणार असं स्पष्ट करतानाच अडीच वर्षात तीन सरकार बदलली आता चौथे सरकार कधीही येऊ शकतं असं सत्तातरांच भाकीतही त्यांनी वर्तवलंय.

मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांची एक मागणी केलीय. मुस्लिमांचे मतदानाचे अधिकार काढून घ्या, असं विधान त्यांनी केलंय यासह अधिक बातम्या ४ मिनिट २४ हेडलाईन्समध्ये

 

Published on: Jan 13, 2023 08:41 AM
Amit Deshmukh : भाजपमध्ये जाणार का? अमित देशमुखांनी दिले थेट उत्तर
अनोख्या मैत्रीची चर्चा : मित्र सरपंच झाला…आनंदात मित्रांनी दिली फॉर्च्युनर गाडीची भेट