Girish Mahajan : पंकजा मुंडे नाराज नाहीत, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांचे मनाचेच मांडे

| Updated on: Aug 29, 2022 | 9:11 PM

दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेटलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पंकजा मुंडे ह्या अत्यंत निष्ठावंत कार्यकर्त्या आहेत, त्यापद्धतीने त्यांचे कार्यही सुरु आहे. त्यांच्या रक्तामध्येही भाजप आहे. त्यामुळे अशा ऑफर देऊन काही उपयोग नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे.

मुंबई : भाजप नेत्या (Pankaja Munde ) पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलेले जात असल्याचे म्हणत (Amol Matkari) अमोल मिटकरी यांनी त्यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफरच दिली होती. यावर आता भाजप नेत्यांकडून स्पष्टीकरण देण्यास सुरवात झाली आहे. पंकजा मुंडे ह्या नाराज नाहीत. त्या पक्षाचे काम जोमाने करीत आहेत. त्यामुळे (Rashtrawadi Party) राष्ट्रवादींच्या प्रवक्त्यांकडून हे मनाचेच मांडे असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. तर हे राष्ट्रवादीचे कपोकल्पित म्हणणे आहे. त्याला कोणताही आधार नाही. त्यामुळे पंकजा मुंडे ह्या कुठेही जाणार नाहीत असे महाजन म्हणाले. तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेटलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पंकजा मुंडे ह्या अत्यंत निष्ठावंत कार्यकर्त्या आहेत, त्यापद्धतीने त्यांचे कार्यही सुरु आहे. त्यांच्या रक्तामध्येही भाजप आहे. त्यामुळे अशा ऑफर देऊन काही उपयोग नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे. ज्या पद्धतीने अमोल मिटकरी यांनी ऑफरची भाषा केली. त्यावरुन भाजप नेते आता स्पष्टीकरण देऊन पंकजा मुंडे ह्या भाजपमध्येच राहणार असा दावा करीत आहेत.

Published on: Aug 29, 2022 09:11 PM
Rohit Pawar : त्यांना आरोप करु द्या, योग्य वेळी उत्तर दिले जाईल
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिमा गोंदली छातीवर, व्हिडीओ व्हायरल