“मी सर्वसमावेशक चेहरा म्हणून माझ्याकडे सर्वजण पाहत आहेत”, बीडमध्ये पंकजा मुंडे यांचं सूचक विधान
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी 2024 साठी रणशिंग फुंकलं आहे. हाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना मराठा आरक्षणाचं कार्ड चालवल्याचं म्हटलं जात आहे.
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी 2024 साठी रणशिंग फुंकलं आहे. हाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना मराठा आरक्षणाचं कार्ड चालवल्याचं म्हटलं जात आहे. “तसेच आपल्याला दुधही पोळलेलं आहे म्हणून आता ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे 2024 हे वर्ष इतिहास घडवणारं म्हणजेच इतिहास बदलणारं वर्ष आहे. मला माध्यमांनी विचारलं, तुम्ही आमदार, खासदार किंवा ग्रामपंचायत सदस्य नाही. मग काय सर्व पक्ष तुम्हाला ऑफर देतात. त्यावर म्हटलं, ते मला माहिती नाही. पण, मी सर्वसमावेशक चेहरा झालेली आहे,म्हणून माझ्याकडे सर्वजण पाहत आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.