“माझं राजकीय करिअर संपवण्याचा हा डाव नेमका कोणाचा?”, काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांवर पंकजा मुंडे आक्रमक
गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याची सुध्दा चर्चा सुरु आहे. त्यावर आज पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरणं दिलं आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याची सुध्दा चर्चा सुरु आहे. त्यावर आज पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरणं दिलं आहे.”मला मागच्या काही दिवसांपासून सतत कॉल येत आहेत. 2019 मध्ये मी भाजपची उमेदवार होते आणि माझा पराभव झाला. त्यानंतर गेले 4 वर्ष मी नाराज आहे. मी पक्ष सोडणार, अशा चर्चा सुरू झाल्या. मला स्वतःला सिद्ध करायच नाहीय. अनेक पक्षाचे नेते देखील बोलत होते की, पंकजा मुंडे अल्या तर त्यांना पक्षात स्थान देऊ. मी सर्व हे सहजतेने घेतलं काँग्रेसचे नेते सुध्दा म्हणत आहेत की, पंकजा मुंडे आल्या तर येऊ द्या, हे सगळं कोण पसरवत आहे ? माझ करिअर संपवण्याचा हा डाव नेमका कुणाचा आहे. मी गेली 20 वर्ष राजकारणात काम करीत आहे. त्याचबरोबर माझ्याबाबत मुद्दाम चर्चा घडवून आणल्या जात आहेत. पंकजा मुंडे पात्र की अपात्र हे पक्ष ठरवेल मी कसं सांगू”, असंही त्या म्हणाल्या.