सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट झाली का? पंकजा मुंडे यांनी सोडलं मौन; म्हणाल्या…

| Updated on: Jul 07, 2023 | 3:02 PM

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यांनी काँग्रेस हायकमांडशी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली, अशा बातम्या येत होत्या. त्यावर आता अखेर पंकजा मुंडे यांनी मौन सोडलं आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यांनी काँग्रेस हायकमांडशी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली, अशा बातम्या येत होत्या. त्यावर आता अखेर पंकजा मुंडे यांनी मौन सोडलं आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की,”मी आज पत्रकार परिषद बोलवली आहे, कारण मला शेकडो कॉल येत आहेत. 2019 मध्ये मी भाजपची उमेदवार होते. माझा पराभव झाला. त्यानंतर गेले 4 वर्ष मी नाराज आहे. मी पक्ष सोडणार, अशा चर्चा सुरू झाल्या. मला स्वतःला सिद्ध करायच नाहीय. अनेक पक्षाचे नेते देखील बोलत होते की, पंकजा मुंडे अल्या तर त्यांना पक्षात स्थान देऊ. मी सर्व हे सहजतेने घेतलं. पण…” पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 07, 2023 03:02 PM
“शिंदे गटातले 17 ते 18 आमदार संपर्कात, आजच सकाळी…”, संजय राऊत यांचा मोठा दावा
शिवाजी आढळराव पाटील शरद पवार यांच्या संपर्कात? अमोल कोल्हे म्हणाले, “त्या दाराची किल्ली माझ्याकडे”