‘माझी भूमिका थेट असणार’, भाजप सोडण्यावरून पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण
त्यानंतर काल त्यांनी यावर आपले स्पष्टीकरण दिले यावेळी त्यांनी आपण भाजप सोडणार नसल्याचे सांगताना काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट सांगितलं. यावेळी त्यांनी भाजप फुटीबाबत मोठं वक्तव्य केलं.
मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून भाजप सोडणार अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर त्या काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा होऊ लागल्या. त्यानंतर काल त्यांनी यावर आपले स्पष्टीकरण दिले यावेळी त्यांनी आपण भाजप सोडणार नसल्याचे सांगताना काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट सांगितलं. यावेळी त्यांनी भाजप फुटीबाबत मोठं वक्तव्य केलं. ज्यामुळे अनेकांच्या मनात भाजप फूटणार का असा सवाल निर्माण झाला. पंकजा मुंडे यावेळी, भारतीय जनता पक्ष फुटेल असा दिवस येऊ नये, असं सूचक विधानही केलं आहे. यावेळी त्यांनी, सध्याच्या राजकारणातले प्रयोग हे कधीच पाहिले नव्हते. बाळासाहेबांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आज राहिली नाही. ती फूटली. मात्र पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी यांची भाजप सदैव राहावी म्हणून माझ्यासारखे कार्यकर्ते हे काम करत आहेत. तर भाजप फुटेल असा दिवस येऊ नये असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.