Special Report | पंकजा मुंडे समर्थकांच्या निशाण्यावर आता भाजपचे नेते! प्रवीण दरेकरांचा ताफा रोखला
पंकजा मुंडेंचे समर्थक आता भाजप नेत्यांचा ताफाही अडवू लागले आहेत. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बीडच्या दौऱ्यावर होते. बीडकडे निघालेले असताना ते पारगावजवळ पोहोचले आणि तिथंच मुंडेंच्या समर्थकांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
पंकजा मुंडेंचे समर्थक आता भाजप नेत्यांचा ताफाही अडवू लागले आहेत. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बीडच्या दौऱ्यावर होते. बीडकडे निघालेले असताना ते पारगावजवळ पोहोचले आणि तिथंच मुंडेंच्या समर्थकांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. सकाळी हा विरोध झाल्यानंतर पारगावापासून प्रवीण दरेकर पुढे बीडकडे निघाले. मात्र वाटेत बीडच्या धांडे परिसरात पुन्हा काही समर्थकांनी प्रवीण दरेकरांच्या गाडीसमोर घोषणाबाजी केली.
पंकजा मुंडेंनाऐवजी यंदा विधानपरिषदेत पुन्हा एकदा प्रवीण दरेकरांची वर्णी लागलीय. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांचा राग प्रवीण दरेकरांवर निघाल्याची चर्चा होतेय. जेव्हा पंकजा मुंडेंनी विधानपरिषद उमेदवारांच्या यादीत नाही नाही, हे माहित झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी मुंडे समर्थकांनी घोषणा दिल्या होत्या. एका कार्यकरत्यानं विषही प्राशन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज भाजप नेत्यांची गाडी अडवली गेली. यावरुन शिवसेनेचे संजय राऊत भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधतायत. तर चंद्रकांत पाटलांनी पंकजा मुंडेंची काळजी घ्यायला भाजप समर्थक असल्याचं उत्तर राऊतांना दिलंय.