Special Report | पंकजांच्या बाजूनं अचानक विरोधक का बोलतायत?
पंकजाताई मुंडे यांची उमेदवारी नाकारल्यानंतर विरोधकांकडून पाठिंबा

Special Report | पंकजांच्या बाजूनं अचानक विरोधक का बोलतायत?

| Updated on: Jun 16, 2022 | 9:28 PM

एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार असूनही जर त्यांच्यावर जर पक्ष अशा पद्धतीने वागत असेल तर ते दुःखदायक आहे असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.

विधान परिषदेच्या उमेदवारीवरुन राज्यातील राजकारण ढवळून निघाले असतानाच आता पंकजा मुंडे यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर अनेक पक्षातून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यांची उमेदवारी नाकारल्यानंतर आता एमआयएम आणि राष्ट्रवादीकडूनही आता बॅटींग करणे सुरु आहे. इम्तियाज जलील यांनी तर पंकजा मुंडे यांनी नवीन पक्ष काढावा आणि त्यांच्या पक्षाला एमआयएम पक्षाकडूनही जोरदार पाठिंबा दिला जाईल असंही त्यांनी सांगितले आहे. एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार असूनही जर त्यांच्यावर जर पक्ष अशा पद्धतीने वागत असेल तर ते दुःखदायक आहे असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.

Published on: Jun 16, 2022 09:26 PM
Special Report | अजित पवारांनी फडणवीसांचं आव्हान स्वीकारलं?
Special Report | Sadabhau Khot यांची उमेदवारी गेली अन् उधारी मागितली-tv9