परशुराम घाट जड वाहनांसाठी आठ दिवस बंद

| Updated on: Jul 06, 2022 | 9:49 AM

परशुराम घाटात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घाट पुढील दोन दिवस जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.

रत्नागिरी: जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. परशुराम घाटात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. परशुराम घाटात दरड कोसळण्याच्या घटना पावसाळ्यात अनेकदा होत असतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आठ दिवस घाट जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबत प्रशासनाकडून आदेश काढण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती

Published on: Jul 06, 2022 09:49 AM
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस; वाशिष्ठी नदीची पाणीपातळी वाढली
कोकणात पावसाचा जोर कायम; 35 हजार लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर