माझी फडणवीसांशी दुश्मनी नाही, पण त्यांनी राजीनामा द्यावा; सुषमा अंधारे यांची मागणी

| Updated on: Apr 08, 2023 | 7:48 AM

Sushma Andhare on Devendra Fadnavis : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्या नेमकं काय म्हणालेत? पाहा...

परभणी : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा”, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांची माझ्याशी दुश्मनी नाही. पण सत्तेचा लोभ त्यांनी जरी बाजूला ठेवावा. अमृता फडणवीस प्रकरणात सखोल आणि नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी. यासाठी फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. चौकशी वेळी अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. आता फडणवीस यांच्या पत्नीची चौकशी सुरु आहे. त्यामुळे फडणवीसांनी राजीनामा द्यावा. फडणवीस यांनी राजीनामा दिला नाही तरी आम्ही मी पुन्हा येईल पुन्हा येईल, असा आक्रस्तळपणा करणार नाही, असा टोलाही अंधारेंनी लगावला आहे.

Published on: Apr 08, 2023 07:45 AM
सर्जरीवरून सुषमा अंधारेंवर शिवसेना नेत्याचा पलटवार; म्हणाल्या, उलट तुम्ही…
खळबळजनक दाव्यानंतर दीपाली सय्यद यांचा घणाघात; आरोप आणि तक्रार