Sandipan Bhumare : संदीपान भुमरे औरंगाबादचे पालकमंत्री होणार-सूत्र, जालन्याचेही पालकमंत्री ठरले!

| Updated on: Aug 30, 2022 | 9:52 AM

औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी संदीपान भुमरे यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब झालं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. आता फक्त याबाबतची अधिकृत घोषणा कधी होते, हे पाहणं महत्त्वाचंय.

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार झाला आहे. खातेवाटपही पार पडलं. अशात पालकमंत्री म्हणून कोणत्या जिल्ह्याची (Maharashtra District) जबाबदारी कुणाला दिली, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. अशातच औरंगाबाद (Aurangabad Politics) आणि जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार, हे आता निश्चित झालं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी संदीपान भुमरे यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब झालं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. आता फक्त याबाबतची अधिकृत घोषणा कधी होते, हे पाहणं महत्त्वाचंय. औरंगाबाद जिल्ह्याला मंत्रिमंडळ विस्तारातही झुकतं माप देण्यात आलं होतं. त्यानंतर आता पालकमंत्रीपदी शिंदे गटातील संदीपान भुमरे यांना संधी दिली जाणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. तर अतुल सावे यांच्याकडे जालना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिलं जाईल, असंदेखील सांगितलं जातंय.

Published on: Aug 30, 2022 09:52 AM
“राजसाहेब, आपणही दसरा मेळावा घेऊ, बाळासाहेबांचा विचारांचा घेऊन पुढे जाऊ”
सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, अतुल भातखळकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल