Prashant Koratkar Case : कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकर प्रकरणावरून आता विरोधक आणि सत्ताधारी पक्षात आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू झाला आहे. तेलंगणामध्ये कोरटकर कोणाकडे लपला होता यावरून हे आरोप प्रत्यारोप केले जात आहे.
प्रशांत कोरटकर याला तेलंगणामध्ये लपण्यास मदत केली होती, असा आरोप परिणय फुके यांनी केला आहे. कोरटकर याचा मोबाईल सापडला, कॉंग्रेस नेता समोर येईल असंही फुके म्हणाले आहेत. तर कोरटकरला कुठे लपवला त्याचं सर्टिफिकेट आणा असं म्हणत वडेट्टीवारांनी देखील हल्लाबोल केला आहे.
कोरटकर हा तेलंगणामध्ये एका कॉंग्रेस नेत्याच्या घरी लपलेला होता. त्यामुळे कॉंग्रेसकडून त्याला वाचवण्याचा निश्चितच प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे कोरटकरवर नक्कीच कडक कारवाई केली जाईल, असं परिणय फुकए यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी म्हंटलं की, तेलंगणामध्ये कोरटकर लपलेला होता तिथल्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आले आहेत. तिथले एक अधिकारी त्याची सेवा करत होते. त्याची देखील माहिती आमच्या हाती आली असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हंटलं आहे.
Published on: Mar 25, 2025 06:47 PM