RAJ THACKAREY : राज ठाकरे यांचे अटक वॉरंट रद्द, पुढील सुनावणी ‘या’ तारखेला
मुंबई ते औरंगाबाद हेलिकॉप्टरचा प्रवास, औरंगाबाद ते परळी मोटार प्रवास, ठिकठिकाणी भव्य जंगी स्वागत स्वीकारून मनसे अध्यक्ष राज ठाकरे परळी कोर्टात पोहोचले आणि पाच मिनिटात...
परळी : २००८ साली नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात कोर्टात सातत्याने गैरहजर राहणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS CHIEF RAJ THACKAREY ) यांच्याविरोधात परळी न्यायालयाने ( PARLI COURT ) अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. त्यामुळे राज ठाकरे आज कोर्टात हजर राहिले. यावेळी राज यांच्या वकिलाने केलेल्या युक्तिवादानंतर त्यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे.
सकाळी 11 वाजता राज ठाकरे कोर्टात हजर झाले. त्यानंतर राज ठाकरे यांच्या वकिलाने कोरोना काळ आणि लिलावती रुग्णालयात दाखल असल्यामुळे राज ठाकरे कोर्टात हजर राहू शकले नव्हते. मात्र, आज ते हजर झाले असून त्यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात यावे असा युक्तिवाद केला.
परळी कोर्टाने या युक्तिवाद मान्य करत राज ठाकरे यांचे अटक वॉरंट रद्द करत 500 रुपयांचा दंड ठोठावला. तसेच, या प्रकरणावर येत्या 23 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.