आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर होणार
थोड्याच वेळात अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरुवात, उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर होणार...
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात आजपासून होतेय. हे अधिवेशन दोन टप्प्यांमध्ये 66 दिवस अधिवेशन चालणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यंदाच्या वर्षातील आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत मांडणार आहेत. मोदी सरकारच्या काळातील शेवटचा अर्थसंकल्प उद्या मांडला जाणार आहे. दरम्यान या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. पाहा…
Published on: Jan 31, 2023 09:59 AM