video | निलेश लंके तुतारीसोबत का घड्याळासोबत ? काय घडले शरद पवार यांच्या भेटीत ?

| Updated on: Mar 14, 2024 | 6:20 PM

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी लंके यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिला का? असा प्रश्न वारंवार विचारण्यात आला परंतू त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. शरद पवार आपले मार्गदर्शक आहेत म्हणून त्यांची भेट घेण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले.

Follow us on

पुणे | 14 मार्च 2024 : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर काका आणि पुतण्याच्या लढाईने राजकारणाचे फासे कुणाच्या बाजूने आहेत हे कळेनासे झाले आहेत. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपण नेमके कोणासोबत आहे हे स्पष्ट केलेले नाही. त्यांच्या ‘मी अनुभवलेला कोविड’ पुस्तकाचे प्रकाशन आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यालत झाले. यावेळी शरद पवार यांनी निलेश लंके यांचे स्वागत केले. परंतू शरद पवार आणि निलेश लंके या दोन्ही नेत्यांनी पत्रकारांना गोंधळून टाकले. निलेश लंके यांनी अजित पवार गटाला सोडचिट्टी दिली का ? या प्रश्नावर दोन्ही नेत्यांनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले. त्यामुळे निलेश लंके यांची आमदारकी वाचविण्यासाठी ही तारेवरची कसरत नेत्यांना करावी लागत आहे का ? असा सवाल केला जात आहे.