कोणत्या प्रकरणावर पटोले यांनी मागितला फडणवीस यांचा राजीनामा?

| Updated on: Aug 01, 2023 | 10:46 AM

परमबीर सिंहप्रकरणी नाना पटोले यांनी थेट फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.'विधानसभा अध्यक्ष असताना लोकसभा अध्यक्ष विचारत होते परमबीर कोण आहे? त्यांच्या भ्रष्टाचाराची फाईल आमच्या हाती आली आहे.

नागपूर : परमबीर सिंहप्रकरणी नाना पटोले यांनी थेट फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.’विधानसभा अध्यक्ष असताना लोकसभा अध्यक्ष विचारत होते परमबीर कोण आहे? त्यांच्या भ्रष्टाचाराची फाईल आमच्या हाती आली आहे. परमबीर एवढा मोठा भ्रष्टाचारी अधिकारी आहे, असे ही म्हणाले होते.मी ही परमबीर यांना बोलावलं होतं. तेव्हा त्यांनी आरोप फेटाळले होते. मला आती ती घटना कळली आहे की, परमबीर सिंह यांच्यावर कॅगचे आदेश जे पारित झाले होते, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की, दर तीन महिन्यांनी त्यांचे रिव्ह्यू व्हावं. पण आताच्या राज्य सरकारने तसे केले नाही. अँटिलिया स्फोटाचं नाट्य हे फडणवीस यांची ठरवलेली स्क्रिप्ट होती, ते आज खरं होताना दिसत आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांवरून महाराष्ट्राला कलंक लागला. 100 कोटी आणले कुठून हा प्रश्न अनुउत्तरीत असताना, महविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी प्यादा म्हणून परमबीर सिंह यांचा वापर केला. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्र्यांवर 100 कोटीचा आरोप लावला त्याचा हिशोब अजून आलाच नाही. त्याकाळी महाविकास आघाडीला बदनाम करण्याचं काम परमबीर सिंह यांना दिलं होत. त्यामुळे आता तांत्रिक पद्धतीने त्यांना कॅगमधून बाहेर काढण्यात आलं. महाराष्ट्राला कलंक लावण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने आणि आताच्या शिंदे-फडणवीस सरकारने केला. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावर स्पष्टोक्ती केली पाहिजे. नाहीतर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही काँग्रेसच्या वतीने करणार आहोत.

Published on: May 16, 2023 01:40 PM
‘तर कायद्याची पदवी पेटीत बंद करून ठेवा’, संजय राऊत यांचा राहुल नार्वेकरांवर निशाणा
पोपट मातोश्रीत एंट्री करत होता, तेव्हा चांगला होता?, नारायण राणे यांचा कुणाला सवाल