Patra Chawl Scam: संजय राऊतांचा आवाज दाबण्याचा भाजपचा प्रयत्न- सुनील राऊत

Patra Chawl Scam: संजय राऊतांचा आवाज दाबण्याचा भाजपचा प्रयत्न- सुनील राऊत

| Updated on: Aug 06, 2022 | 12:36 PM

देशात विजय माल्या आणि निरव मोदी सारखे लोकं मोठं मोठे घोटाळे करतात मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही, तसेच त्यांना ईडीची नोटीस येते ते भाजपात गेल्यानंतर स्वछ होतात असा टोलाही त्यांनी लगावला.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Scam) इडीच्या ताब्यात असलेले संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीसुद्धा आज चौकशी होणार आहे. वर्षा राऊत या ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या आहेत. या प्रकरणी संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांचा आवाज दाबण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे सुनील राऊत म्हणाले. संजय राऊत हे भाजपच्या विरोधात बोलतात त्यामुळे त्यांना मुद्दाम या प्रकरणात अडकवले जात असल्याचे सुनील राऊत म्हणाले. इडी दबावाखाली काम करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांनी केला आहे. देशात विजय माल्या आणि निरव मोदी सारखे लोकं मोठं मोठे घोटाळे करतात मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही, तसेच त्यांना ईडीची नोटीस येते ते भाजपात गेल्यानंतर स्वछ होतात असा टोलाही त्यांनी लगावला.

Published on: Aug 06, 2022 12:35 PM
Video : …तर जलिलांनी आपल्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवावं- रावसाहेब दानवे
Maharashtra: 40 मंत्र्यांचा निर्णय घेऊ शकत नाही मग राज्य कसे चालवणार? – सतेज पाटील