पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांची चौकशी करा, भाजपाच्या ‘या’ नेत्यांची मागणी

| Updated on: Sep 20, 2022 | 3:21 PM

तत्कालीन कृषीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे मुख्यमंत्री या सर्वांचा पत्राचाळ घोटाळ्यात काय सहभाग आहे, याची चौकशी करावी, अशी विनंती अतुल भातखळकर यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुंबईः पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री (शरद पवार) याचं नाव आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोप पत्रात आज हा नवा खुलासा झाला आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात शरद पवारांचं (Sharad Pawar) नाव असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी करा, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ही मागणी केली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात 2006-07 मध्ये संजय राऊत यांच्यासोबत तत्कालीन मुख्यमंत्री (विलासराव देशमुख), केंद्रीय कृषीमंत्री (शरद पवार) आणि म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांमध्ये बैठका झाल्या होत्या. या बैठकांनंतरच मनी लाँड्रिंग होत गेल्याचा आरोप ईडीने केला आहे.

गुरु आशीष कंस्ट्रक्शन कंपनीला पत्राचाळीचं कंत्राट देण्यात राज्याचे जाणते राजे शरद पवार यांचाही सहभाग होता, हे ईडीने पुराव्यानिशी चार्जशीटमध्ये दाखवून दिलंय. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री यांनी याची चौकशी करावी, अशी मागणी मी पत्राद्वारे केली असल्याचं अतुल भातखळकर यांनी म्हटलंय.

Published on: Sep 20, 2022 03:19 PM
Video | पत्राचाळ घोटाळा प्रकरणात Sharad Pawar यांचं नाव? काय आहेत आरोप?
आता पेंग्विन विरुद्ध चित्ते वाद, अजित पवारांच्या वक्तव्यावर बावनकुळेंचा प्रश्न काय?