Special Report | ईडीच्या नजरेत संजय राऊतांचे 55 लाख?-tv9
जमिनी गुरु आशिष बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी परस्पर खासगी बिल्डरांना विकल्याचं समोर आलं. पत्राचाळ प्रोजेक्ट संदर्भात 13 मार्च 2018ला म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्याकडून तक्रार करण्यात आली.
शिवसेनेचे फायर ब्रँड नेते, ईडीच्या फेऱ्यात आलेत…ईडीनं राऊतांविरोधात एप्रिल महिन्यातच कारवाईचा फास आवळलाय..5 एप्रिलला ईडीनं राऊतांची संपत्ती जप्त केली. अलिबागच्या किहीम बीचवरील राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांच्या नावावरील जमिनीचे प्लॉट आणि दादरमधील संजय राऊतांचा राहता फ्लॅटही जप्त करण्यात आला आणि ही कारवाई सुद्धा गोरेगावातल्या पत्राचाळ प्रकल्पाशी संबंधित होती. संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांना याच प्रकरणात ईडीनं अटक केलीय. आणि सध्या ते कोठडीतच आहेत. राऊतांच्या मागे पत्राचाळ प्रकरण आणि 55 लाखांच्या व्यवहारामुळं ईडी लागलीय, गोरेगावच्या सिद्धार्थ नगरमध्ये 672 घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी म्हाडा आणि बिल्डरसोबत करार केला. 13 एकरपैकी साडेचार एकरवर मूळ रहिवाशांना घरं दिली जातील आणि उर्वरित भागात म्हाडा आणि बिल्डर विक्री करेल असंही ठरलं. . मात्र जमिनी गुरु आशिष बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी परस्पर खासगी बिल्डरांना विकल्याचं समोर आलं. पत्राचाळ प्रोजेक्ट संदर्भात 13 मार्च 2018ला म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्याकडून तक्रार करण्यात आली.