‘माशाची तडफड होते तशी सत्ता गेल्यानंतर त्यांची अवस्था’; उद्धव ठाकरे यांच्यावर कुणी केला घणाघात?

| Updated on: Aug 19, 2023 | 8:30 AM

पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे. तर त्यांच्या मुख्यमंत्री कार्यावरून त्यांनी टोला लगावला आहे.

अहमदनगर : 19 ऑगस्ट 2023 | पन्नास खोक्यावरून माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी जल बिना मछली ज्याला आपण म्हणतो तशी अवस्था आज उद्धव ठाकरे आणि त्यांच्या महाविका आघाडीची झाली आहे. ते सुद्धा सत्तेविना माशाप्रमाणेच तडफड आहेत, अशी टीका केली आहे. तर एकनाथ शिंदे बाहेर पडले तेव्हा 50 खोके म्हणत टीका करण्यात आली. मात्र अजित पवार सत्तेत प्रवेश करताच ही टीका का बंद झाली असा सवाल देखील त्यांनी केला आहे. तर ४० आमदार आणि १२ खासदार बाहेर पडणं साधी काही गोष्ट नाही. खोक्यांनी ही माणसं विकत घेता येतात का? सदन आणि सक्षम लोकांना विकत घेता येत का? असा सवाल देखील यावेळी त्यांनी ठाकरे यांना केला आहे. तर ठाकरे मुख्यमंत्री असताना उंटावरून शेळी हाकण्याचं काम करत होते अशी देखील घणाघाती टीका केली आहे. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तळागाळात जाऊन लोकांची व्यथा जाणून घेतात. त्यामुळे टीका न करता शिंदेंच्या चांगल्या कामाचा कौतुक करा असा टोला देखील कवाडे यांनी ठाकरेंना लगावला आहे.

Published on: Aug 19, 2023 07:43 AM
पुणे स्थानकातून सुटणाऱ्या १२ लोकल, एक्स्प्रेस गाड्या रविवारी रद्द, काय आहे कारण?
VIDEO | ‘’तु रडल्या सारखं कर मी मारल्या सारखं करतो’ अशी तर त्यांची भूमिका नाही ना?’, कुणी घेतली शंका?