बावनकुळेंना परवानगी, मग मला का नाही? पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषद घेण्याचा ज्वाला धोटेंचा आग्रह
सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांचा नागपूर पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषद घेण्याचा आग्रह होता, मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषद कशी घेऊ देता असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. बावनकुळेंना परवानगी दिली मग मला का देत नाही असे म्हणत त्यांनी पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊ देण्याची मागणी केली. भाजपाच्या नेत्यांसाठी वेगळा […]
सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांचा नागपूर पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषद घेण्याचा आग्रह होता, मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषद कशी घेऊ देता असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. बावनकुळेंना परवानगी दिली मग मला का देत नाही असे म्हणत त्यांनी पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊ देण्याची मागणी केली. भाजपाच्या नेत्यांसाठी वेगळा कायदा आणि सामान्यांसाठी वेगळा कायदा असे का? असा प्रश्न त्यांनी पोलीस आयुक्तांना विचारला आहे. ज्वाला धोटे या प्रखर राष्ट्रवादी नेते जांबुवंतराव धोटे यांच्या कन्या आहेत. नागपुरातले गंगा-जमुना ही वैश्या वस्ती सील केल्यानंतर त्यांनी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.
Published on: Jun 18, 2022 04:23 PM