राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला 13 अटी-शर्थींसह परवानगी

| Updated on: May 22, 2022 | 9:55 AM

राज ठाकरे यांची थोड्याच वेळात पुण्यामध्ये सभा होणार आहे. या सभेला पोलिसांकडून 13 अटी-शर्थींसह परवानगी देण्यात आली आहे.

आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार आहे. या सभेला थोड्याच वेळेत सुरुवात हेईल. दरम्यान औरंगाबादप्रमाणेच या सभेसाठी देखील पोलिसांकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींचे उल्लंघन करू नका असे आवाहन देखील पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. जातीय तेढ निर्माण होईल अशी वक्त्यव्यं टाळावेत ही पोलिसांची प्रमुख अट आहे. आज राज ठाकरे नेमके काय बोलणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Petrol Diesel Price : केंद्राचा करकपातीचा निर्णय, पेट्रोल, डिझेल झाले स्वस्त
VIDEO : Raj Thackeray Pune Sabha LIVE : अफजल खानाची मशिद उभी राहिली!