ठाकरे गटाच्या आमदाराला महापालिकेचा झटका; पालिका निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव, नेमकं कारण काय?
जोगेश्वरी येथील आरक्षित जमीनीवर पंचतारांकित हॉटेल उभारण्याची दिलेली परवानगी आता रद्द करण्यात आली आहे. त्यांनी तशी नोटीस पालिकेच्या अंधेरी पश्चिम विभागाने बजावली आहे. त्यावरून वायकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांना मुंबई महापालिकेने जोरदार धक्का दिला. त्यांच्या जोगेश्वरी येथील आरक्षित जमीनीवर पंचतारांकित हॉटेल उभारण्याची दिलेली परवानगी आता रद्द करण्यात आली आहे. त्यांनी तशी नोटीस पालिकेच्या अंधेरी पश्चिम विभागाने बजावली आहे. त्यावरून वायकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच महापालिकेविरोधातच आता याचिका दाखल करत दाद मागितली आहे. बांधण्यासाठी 2021 मध्ये रितसर महापालिकेकडून परवानगी मिळाली आहे. मात्र आता अचानक परवानगी रद्द करण्यात आल्याची नोटीस बजावली आहे. यादरम्यान वायकर यांच्यावर 500 कोटींचा घोटाळाचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. तर याप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी भाजपच्या प्रतिनिधी मंडळ यांना दिल्याचे म्हणाले होते.