Petrol Diesel Price : केंद्राचा करकपातीचा निर्णय, पेट्रोल, डिझेल झाले स्वस्त
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केल्याने पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले आहे. वाढत्या महागाईत हा सामान्यांसाठी मोठा दिलासा मानण्यात येत आहे.
केंद्र सरकारकडून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेला मोठा दिलासा देण्यात आला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी करामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. करामध्ये कपात करण्यात आल्याने पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले आहे. पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोल, डिझेल स्वस्त झाल्याने सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान केंद्रापाठोपाठ राजस्थान, केरळ आणि ओडिशा या राज्यांनी देखील इंधनावरील व्हॅट कमी केला आहे.
Published on: May 22, 2022 09:44 AM