प्रताप सरनाईकांच्या अडचणी वाढल्या; गंभीर आरोप करत ठाणेकरांकडून जनहित याचिका
राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाई यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी, मुंबई : राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाई (Pratap Sarnaik) यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ठाण्यात (Thane) दफन भूमीसाठी राखीव असलेला भूखंड हडप केल्याचा आरोप करत ठाणेकरांच्या वतीने प्रताप सरनाईक यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. इमारती बांधण्यासाठी भूखंड हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या जनहित याचिकेवर येत्या तीन ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. एका प्रकरणातून काहीसा दिलासा मिळालेला असताना आता प्रताप सरनाईक यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सरनाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता तीन ऑक्टोबरला सुनावणीदरम्यान काय होणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.