पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक
पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबत आज चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. पाहा व्हीडिओ...
पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीबाबत आज चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. भाजपाकडून कोणाला उमेदवारी देण्यात यावी याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, माजी खासदार अमर साबळे, दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप, बंधू शंकर जगताप यांनी बैठकीला हजेरी लावली आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून कुणाला उमेदवारी देण्यात येणार यावर आज शिक्का मोर्तब होऊ शकतं.
Published on: Jan 25, 2023 01:49 PM