Rupali Chakankar | राज्य महिला आयोगाकडून 3 जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधाचं नियोजन -tv9

| Updated on: Jun 18, 2022 | 9:07 PM

या वारीत महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन, वेंडिंग मशिनची सुविधा करण्यात येणार आहेत. तर स्त्री-रोग तज्ज्ञ, स्तनदा मातांसाठी विसावा कक्ष ही असणार आहे.

पुणे : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान हे 21 जूनला होणार आहे. तर ही वारी (Wari) 9 जुलैला पंढरपुरात पोहोचेल आणि आषाढी एकादशी ही 10 जुलैला. त्यामुळे सध्या आळंदीत लगबग सुरू झाली आहे. तर या वारीत मोठ्या प्रमाणात महिलावर्ग ही सामिल होत असल्याने त्यांच्या अरोग्याच्या दृष्टीने योग्य ती पालवे उचलण्यात आली आहेत. वारीत महिलांसाठी तर विशेष सुविधा म्हणून आरोग्य पथक तैनात करण्यात येतील. याबाबत राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Commission for Woman) अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माहिती देताना, ही वारी आरोग्यवारी असणार असल्याचे म्हटलं आहे. तर राज्य महिला आयोगाकडून तीन जिल्ह्यात (पुणे, सातारा, सोलापूर) आरोग्य पथक तैनात करण्यात येतील अशीही माहिती चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे. तर महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन, वेंडिंग मशिनची सुविधा करण्यात येणार आहेत. तर स्त्री-रोग तज्ज्ञ, स्तनदा मातांसाठी विसावा कक्ष ही असणार आहे. दर दहा ते पंधरा किलोमीटरवर ही व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तर आरोग्य वारीचा शुभारंभ हा पुण्यात होणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.

Published on: Jun 18, 2022 09:07 PM
Sena Vs BJP | Borivali उड्डानपुलाच्या लोकार्पणावरुन आमनेसामने-tv9
Pune Agneepath Protest | अग्निपथ योजनेविरोधात काँग्रेसचा मोर्चा-tv9