Ratnagiri Plastic Ban : रत्नागिरीत 1 जुलैपासून प्लास्टिक बंदी
रत्नागिरीत प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नवा नियम एक जुलैपासून लागू होणार आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोक कारवाई करण्यात येणार आहे.
रत्नागिरी शहर प्रशासनाकडून प्लास्टिक बंदीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एक जुलैपासून रत्नागिरीमध्ये पूर्णपणे प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधीत व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जाऊ शकतो. प्लास्टिक पर्यावरणाला घातक आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लास्टिक वापराला आळा बसावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Published on: May 28, 2022 09:49 AM