56 इंच की थाली, खाणार त्याला साडे आठ लाखांचं बक्षीस; मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने खुली ऑफर

| Updated on: Sep 16, 2022 | 4:41 PM

40 मिनिटात ही थाळी खाणाऱ्यांना एक दोन नव्हे तर साडे आठ लाख रुपयांचं बक्षीसही देण्यात येणार आहे. तसेच केदारनाथला जाण्याची संधीही मिळणार आहे. कनॉट प्लेस येथील आडरेर 2.1 नावाच्या रेस्टॉरंटमध्ये ही ऑफर देण्यात आली आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांचा उद्या वाढदिवस आहे. देशभरात मोदींचा वाढदिवस दणक्यात साजरा होणार आहे. दिल्लीतही (delhi) एका हॉटेलने मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने एक स्पेशल थाळी तयार केली आहे. ’56 इंच की थाली’ (Special Thali Delhi) असं या थालीला नाव दिलं आहे. या थाळीत 32 ते 33 वेगवेगळे पदार्थ ठेवण्यात आले आहेत. 40 मिनिटात ही थाळी खाणाऱ्यांना एक दोन नव्हे तर साडे आठ लाख रुपयांचं बक्षीसही देण्यात येणार आहे. तसेच केदारनाथला जाण्याची संधीही मिळणार आहे. कनॉट प्लेस येथील आडरेर 2.1 नावाच्या रेस्टॉरंटमध्ये ही ऑफर देण्यात आली आहे. 17 सप्टेंबरपासून ते 26 सप्टेंबरपर्यंत ही ऑफर असणार आहे.

Published on: Sep 16, 2022 04:40 PM
Pune Rain Update | हवामान खात्याकडून पुणेकरांना सतर्कतेचा इशारा-TV9
Nagpur | काँग्रेस आता डुबतं जहाज तर आम्ही प्रचंड वेगात चालणारी बुलेट ट्रेन-tv9