PM Modi in Dehu- देहू-आळंदीचा विकास झाला पाहिजे; पंतप्रधान मोदींकडून स्थानिक नेत्यांची मागणी
तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देहू येथे होणार आहे (PM modi in dehu). त्यासाठी वारकरी आणि स्थानिक नेते मंडळी मोठयाप्रमाणात उपस्थित आहेत. यावेळी TV9 मराठी ने स्थानिक नेत्यांशी संवाद साधला. देशातल्या तीर्थ क्षेत्राच्या विकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने काशी विश्वेश्वराच्या धरतीवर संत तुकाराम महाराजांची […]
तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देहू येथे होणार आहे (PM modi in dehu). त्यासाठी वारकरी आणि स्थानिक नेते मंडळी मोठयाप्रमाणात उपस्थित आहेत. यावेळी TV9 मराठी ने स्थानिक नेत्यांशी संवाद साधला. देशातल्या तीर्थ क्षेत्राच्या विकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने काशी विश्वेश्वराच्या धरतीवर संत तुकाराम महाराजांची कर्म भूमी असलेले देहू या तीर्थ क्षेत्राचाही विकास व्हायला हवा अशी मागणी यावेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली. ज्याप्रकारे गंगा शुद्धीकरणासाठी पाऊलं उचलली गेली त्याच प्रमाणे इंद्रायणी नदी शुद्ध करण्यासाठीही प्रयत्न करावा असेही ते म्हणाले. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहू येथे येणारे देशातले पहिले पंतप्रधान आहेत. यातच सगळं आलेलं आहे असे मत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मांडले.