राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मोदी-पवार एकाच मंचावर; हस्तांदोलन करत शरद पवार यांनी थोपटली पाठ!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी उपस्थिती लावली आहे.
पुणे, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुण्यातील एसपी महाविद्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी उपस्थिती लावली आहे. हे दोन्ही नेते आल्याने या पुरस्कार सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांची मंचावर भेट घेतली. त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशील कुमार शिंदे यांची सुद्धा भेट घेतली.
Published on: Aug 01, 2023 01:01 PM