“भारत विश्व गुरु व्हावा”, पंतप्रधान मोदी दगडूशेठ हलवाई गणपतीकडे करणार संकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांना टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान मोदी या दौऱ्याची सुरुवात सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने करणार आहेत. या निमित्ताने मंदिर प्रशासनाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
पुणे, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांना टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान मोदी या दौऱ्याची सुरुवात सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने करणार आहेत. या निमित्ताने मंदिर प्रशासनाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिराचे मुख्य पुजारी मिलिंद राहुकर यांनी पंतप्रधान मोदी गणपतीची पुजा करतील असं सांगितलं. यानंतर भारत विश्वामध्ये विश्व गुरु व्हावा, चंद्रयान मोहिमेला यश मिळण्या साठी संकल्प केला जाईल. यानंतर पंतप्रधआन मोदींच्या हस्ते गणपतीच्या मुर्तीला अभिषेक दिला जाईल. मंदिर प्रशासनाकडून पंतप्रधान मोदींना फळांचा प्रसाद आणि सन्मान केला जाईल.
Published on: Aug 01, 2023 07:37 AM