PM Narendra Modi : केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय – पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi : केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय – पंतप्रधान नरेंद्र मोदी

| Updated on: Mar 28, 2025 | 7:08 PM

TV9 Network WITT2025 : आज हर घर जलद्वारे त्यांना पाणी मिळत आहे. केवळ दशक बदललं नाही तर लोकांचं आयुष्य बदललंय, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टीव्ही 9 च्या महामंचावर बोलताना व्यक्त केला आहे.

२०१३मध्ये महिला बँक खात्याबाबत मौन असायच्या. आज ३० कोटी महिलांचं जनधन योजनेद्वारे बँकेत खातं आहे. २०१३मध्ये महिलांना तलवापर्यंत जावं लागायचं. आज हर घर जलद्वारे त्यांना पाणी मिळत आहे. केवळ दशक बदललं नाही तर लोकांचं आयुष्य बदललंय, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं आहे. टीवी 9 नेटवर्कचा मेगा इव्हेट ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’ला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. जगही भारताचं डेव्हल्पमेंट मॉडेल स्वीकारत आहे. आज नेशन ऑफ ड्रीम नाही, नेशन ऑफ डिलिव्हर झाला आहे. जेव्हा एखादा देश नागरिकांच्या सुविधांना महत्त्व देतो, तेव्हा देशाचं नशीब बदलतं, असंही यावेळी त्यांनी म्हंटलं.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पूर्वी पासपोर्ट बनवणं अधिक कठिण होतं. राज्याच्या राजधानीतच पासपोर्ट केंद्र असायचं. छोट्या शहरातील लोकांना पासपोर्ट बनवायचं असेल तर शहरात एक दोन दिवस राहावं लागायचं. केवळ ७७ पासपोर्ट सेवा केंद्र होते. आता ५५० पेक्षा जास्त आहे. पूर्वी पासपोर्ट बनवण्यासाठी वेटिंग टाईम ५० दिवस होता. आता तो पाच सहा दिवसावर आला आहे. आता बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असाच बदल झाला. ५०-६० वर्षापूर्वी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. पण गावात बँकांची सुविधाच नव्हती. आम्ही प्रत्येक घरात ऑनलाईन बँकिंग सुविधा दिली. देशात प्रत्येक पाच किलोमीटरवर बँकिंगचा टच पॉइंट आहे. आपण बँकिंग सिस्टिम मजबूत केली. बँकेचा एनपीए कमी झाला आहे. बँकेचे प्रॉफिट एक लाख कोटीच्यावर गेलं आहे. ज्यांनी बँकांना लुटलं. त्यांनाही पैसे द्यावे लागत आहे. ईडीला शिव्या दिल्या जात आहे, त्या ईडीने २२ हजार कोटी वसूल केले आहेत. हा पैसा कायदेशीर मार्गाने पीडितांना परत केला आहे. ज्यांच्याकडून पैसा लुटला त्यांना परत दिला जात आहे. एफिशियन्सीने सरकार इफेक्टिव्ह होत आहे. कमी वेळात अधिक काम झालं पाहिजे. वायफळ खर्च नसावा. रेड कार्पेट नसावा. जेव्हा सरकार हे करते तेव्हा ते सरकार देशातील संसाधनांचा रिस्पेक्ट करत आहे हे लक्षात ठेवा, असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं.

Published on: Mar 28, 2025 07:08 PM
Chandrashekhar Bawankule : बावनकुळे – राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
Kunal Kamra : कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा