PM Narendra Modi : आपले संस्कार आणि पद्धत काय आहे, ते कोरोना काळात जगाने पहिलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली भावना

PM Narendra Modi : आपले संस्कार आणि पद्धत काय आहे, ते कोरोना काळात जगाने पहिलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली भावना

| Updated on: Mar 28, 2025 | 6:03 PM

TV9 What India Think Today : टीवी 9 नेटवर्कचा मेगा इव्हेट ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’ला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला

जगातील १५० देशापर्यंत औषधे आणि व्हॅक्सीन पोहोचवलं. जग संकटात असताना भारताची ही भावना जगातील कानाकोपऱ्यात गेली. आपले संस्कार आणि पद्धत काय आहे हे जगाला कळलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे. टीवी 9 नेटवर्कचा मेगा इव्हेट ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’ला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. गेल्या काही वर्षांत भारताने केलेल्या गौरवशाली कामगिरीचा उल्लेख केला.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत भविष्याला सेफ आणि सेक्युअर करण्याच्या प्रयत्नात योगदान देत आहे. जगाने करोना काळात चांगलाच अनुभव घेतला. प्रत्येक भारतीयांना व्हॅक्सीन पोहोचण्यासाठी अनेक वर्ष लागतील असं जगाला वाटत होतं. पण भारताने प्रत्येक आशंका दूर केली. आम्ही आपली व्हॅक्सीन तयार केली. आम्ही आपल्या नागरिकांचं वेगाने व्हॅक्सिनेशन केलं. भूतकाळात जगांनी पाहिलं की, दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा कधी वैश्विक संकट आलं तेव्हा काही देशांचीच मोनोपॉली राहिली आहे. भारताने मोनोपॉली नाही, मानवतेला महत्त्व दिलं. भारताने २१ व्या शतकातील ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या स्थापनेचा मार्ग निर्माण केला. सर्वांची भागिदारी असावी, सर्वांचं योगदान असावं हे ठरवलं. देश कोणताही असो, या संकटाने पायाभूत सुविधांवर परिणाम होत आहे, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हंटलं.

दरम्यान, आज म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाचा उल्लेख करत ते म्हणाले की, म्यानमारमध्ये आज भूकंप झाला. इमारती तुटत आहे. त्यामुळे भारताने सीडीआरआई नावाचं वैश्विक संघटना स्थापन करण्यात पुढाकार घेतला. नैसर्गिक संकटात जगाला मदत व्हावी म्हणून ही संघटना काम करेल. पायाभूत सुविधा व्यवस्थित राहिल यासाठी आमचा प्रयत्न आहे. भविष्यातील आव्हानाला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक देशाने एकत्रित काम करणं गरजेचं आहे, असंही मोदींनी सांगितलं.

Published on: Mar 28, 2025 06:02 PM
‘भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी’, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
PM Narendra Modi : आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना