PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
PM Narendra Modi Nagpur Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात भेट दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय केशव कुंज येथे भेट दिली. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर (गुरुजी) यांच्या स्मृती मंदिराला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. यानंतर पंतप्रधान मोदी दीक्षाभूमीला गेले आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. दीक्षाभूमी हे आरएसएस कार्यालयाच्या अगदी जवळ आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी येथे येऊन ध्यानधारणा केली होती.
Published on: Mar 30, 2025 12:13 PM