पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
आज दुपारी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हा चित्रपट पाहणार आहेत. चित्रपट दिल्लीच्या बालयोगी ऑडिटोरियममध्ये ते आज चित्रपट पाहतील.
आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक खास काम करणार आहेत. ते आज चक्क एक चित्रपट पाहणार आहेत. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचं बऱ्याच लोकांनी कौतुक केलंय. पंतप्रधान मोदी आजा हाच चित्रपट पाहणार आहेत. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटांचं नरेंद्र मोदी यांनीदेखील खूप कौतुक केलं होतं. या चित्रपटात विक्रांत मस्सी याची प्रमुख भूमिका आहे.
आज दुपारी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हा चित्रपट पाहणार आहेत. चित्रपट दिल्लीच्या बालयोगी ऑडिटोरियममध्ये ते आज चित्रपट पाहतील.साबरमती रिपोर्ट हा चित्रपट गुजरातमधील गोध्रा कांडावर आधारित असून गेल्या महिन्यात, 15 नोव्हेंबर रोजी तो प्रदर्शित झाला होता. पंतप्रधान मोदी यांच्यासह अमित शाह यांनी देखील या चित्रपटाचं बरंच कौतुक केलं होतं. ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट काही राज्यात टॅक्स फ्री करण्यात आला आहे.