औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणार, सभेला अटींसह परवानगी
राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेचा मार्ग मोकळा झाला असून, पोलिसांकडून सभेसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद : एक मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. मात्र ही सभा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने सभा होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होते. अखेर राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबद पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेचा मार्ग मोकळा झाला असून, औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. मात्र या सभेसाठी काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत. सभा ही ठरलेल्या वेळेतच व्हावी. सभेला 15 हजारांपेक्षा अधिक नागरिकांची गर्दी नसावी. जात, धर्म यावरून वादग्रस्त वक्तव्य टाळावीत. माईकच्या आवाजाची मर्यादा पाळावी अशा अनेक अटी घालण्यात आल्या आहेत.