एक चूक अन् संपूर्ण कुटुंब तुरुगांत, पुणे अपघात प्रकरणी आरोपीच्या आईला अटक
पुणे हिट अँड रन प्रकरणी अखेर शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. शिवानी अग्रवालवर मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
पुण्यातील अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांना पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता संपूर्ण अग्रवाल कुटुंबच तुरुंगात गेल्यासारखी परिस्थिती झाली आहे. आधी नातू, नंतर वडील, आजोबा आणि आता आई सर्वच पोलिसांच्या ताब्यात आहेत. एकाच कुटुंबातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची ही पुण्यातील कदाचित पहिलीच वेळ असेल. या प्रकरणी शिवानी अग्रवाल यांची कसून चौकशी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.या प्रकरणात शिवानी यांचा किती हात आहे? त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून रक्ताचे नमुने बदलले? याबाबतचे आर्थिक व्यवहार कुणी केले? याची माहिती पोलीस शिवानी यांच्याकडून घेणार आहेत.
Published on: Jun 01, 2024 02:51 PM